breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमधील बैस शहरात लॉकडाऊन; घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई

 

बीजिंग | टीम ऑनलाइन
चीनवरील कोरोनाचे संकट काही थैमान घालायचे थांबलेले नाही. पुन्हा एकदा चीनमधील एका शहरात पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ४ मिलियन लोकसंख्या असलेल्या बैस या शहरात कोरोनाचा सुपर स्प्रेडर वेरी एंटोनीमने धुमाकूळ घातल्याने पुन्हा एकदा लाखो लोक घरात कैद झाले आहेत. बीजिंच विंटर ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेखातर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चीनमधील प्रशासनानेही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. तीन दिवसांत ७० पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जगातल्या बलाढ्य अर्थव्यवस्थेपैकी एक असूनही चीनने कोविडबाबत कडक पावले उचलण्यात कोणतीही कसूर न केल्याचाही सूर ऐकायला मिळत आहे. दरम्यान, आता लॉकडाऊनमुळे चीनमधील लोकांचे मात्र पुन्हा एकदा हाल सुरू होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

बैस हे शहर व्हिएतनाम बॉर्डरपासून १०० किलोमीटर दूर वसलेले आहे. शुक्रवारी या ठिकाणी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. नव्या वर्षाची सुट्टी एन्जॉय करून परतलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णवाढीचा भडका पाहायला मिळाला. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने प्रशासनाने पावले उचलत लॉकडाऊन घोषित केला. गुआंगशीतील बैस शहरात आता लॉकडाऊनमुळे कोणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यामुळे लोकांना घरातच कैद करण्यात आले आहे. इतकेच काय तर गाड्यांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता प्रशासनाकडून समूह चाचणी सुरू करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button