breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Lockdown: लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला तब्बल चार कोटींचा दंड
लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे चार कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.