breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Lockdown: धक्कादायक! कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसांवर निहंगांचा हल्ला; तलवारीनं कापला हात

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावलं उचलली जात आहे. अशातच पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहे. पंजाबमध्येही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्यानं कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीनं हातच कापला. यात इतर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली.

महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमधील स्थितीही करोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अमलबजावणी सुरू केली. मात्र, दुसरीकडं पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. पटियालामध्ये निहंगा (परंपरेनं शस्त्र ठेवण्याची अनुमती असलेले निळा गणवेश परिधान करणारे) टोळक्यानं पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. निहंगांचा एक गट एका पांढऱ्या गाडीतून पटियालातील भाजी मंडईमध्ये जात होते. यावेळी लॉकडाउन असल्यानं बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडले आणि पुढे निघून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्यानं पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्यानं एका सहायक पोलीस निरीक्षकाचा तलवारीनं हातच कापला. तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button