breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Lockdown: अवैध दारूविषयी चौकशी करताच पोलिसांवर हल्ला

जालना : शेतात देशी दारू आढळल्यामुळे चौकशी केली असता जमावाने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील हिसोडा गावाच्या परिसरात शनिवारी घडली. हिसोडा गावाच्या शिवारात अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंत कारवाईसाठी गेलेले पारध पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर शिंदे आणि दोघांवर जमावाने हल्ला केला.

संबंधित व्यक्तीने औरंगाबाद जिल्ह्य़ात येत असलेल्या जळकी (ता. सिल्लोड) गावात मोबाइलवर संपर्क केला. त्यानंतर आलेल्या जमावाने पोलिसांवरच लाठय़ा-काठय़ांनी हल्ला केला.

करोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमावरील आक्षेपार्ह संदेश त्याचप्रमाणे चित्रफितींवर जालना सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासंदर्भात नऊ गुन्हे दाखल झालेले असून यापैकी सहा गुन्ह्य़ांमधील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जालना सायबर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक कीर्ती पाटील यांनी सांगितले की, अफवा पसरविणे तसेच दोन समाजघटकांत तेढ निर्माण होईल, असे मजकूर अग्रेषित केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी पाच गुन्हे व्हॉटसअ‍ॅपवरील तर तीन गुन्हे फेसबुकच्या संदर्भातील आहेत.

दरम्यान, टाळेबंदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानात जास्त दराने विक्री केल्याबद्दल जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील दुकानदाराचे प्राधिकारपत्र जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केले असून त्याची अनामत रक्कम जप्त केली आहे. संबंधित दुकानदारांच्या चित्रफितीच्या आधारे याप्रकरणी चौकशी केल्यावर ही कारवाई करण्यात आली. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेमध्ये नसणाऱ्या वाहनांना इंधन दिले म्हणून अंबड येथील दोन पेट्रोल पंपांचे मालक, नोकर आणि ग्राहक आदी नऊ व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. त्याचप्रमाणे जालना शहरातील एका पेट्रोल पंपाचे मालक, व्यवस्थापक आणि अत्यावश्यक सेवेत नसतानाही पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या सात व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button