breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: अलिगढमध्ये दुकानं बंद करायला सांगणाऱ्या पोलिसांवर हल्ला, दगडफेक

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरता ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. या काळात जिवनावश्यक गोष्टींचा अपवाद वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. तरीही या काळात देशातील काही भागांमध्ये नागरिक लॉकडाउनचे नियम मोडत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस यंत्रणेवर ताण पडत आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे दुकानं बंद करायला सांगणाऱ्या पोलिसांवर स्थानिक लोकांनी हल्ला करत दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली आहे.

“या भागात भाजीवाल्यांचं आपापसात वाद सुरु होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर येत दुकानं बंद करण्याचे आदेश दिले, यावेळी लोकांनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. सकाळी ६ ते १० या वेळातच अलिगढ भागात दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी अधीकची कुमक मागवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

याआधीही उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांवर हल्ला झालेला आहे. मध्य प्रदेशातही इंदूर व अन्य भागांत पोलिस व डॉक्टरांवर हल्ले झाले, ज्यात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान अलिगढ मधील घटनेत सुदैवाने कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button