breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Lockdown|हजारोंची गर्दी असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव

नवी मुंबई | नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इथल्या मसाला बाजारमध्ये कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. मसाला मार्केट मधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी चुनाभट्टी येथे राहणार आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये दररोज हजारो लोकांची येजा सुरू असते. कम्युनिटी संसर्गची भीती सत्यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने एपीएमसी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. संबंधीत व्यापार्याच्या दुकानामध्ये काम करणारे कर्मचारी, सामान उचलणारे माथाडी कामगार, खरेदीदार यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. संबंधित कोरोनाग्रस्त व्यापारी आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आला ? तसेच त्याच्या घरच्या मंडळींची देखील चाचणी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button