breaking-newsराष्ट्रिय

#Lockdown:देशभरातून १३ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त मजूर परतले आपल्या राज्यात

मंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. परंतु अशा परिस्थितीत मजुरांना आपल्या राज्यात परत पोहचवण्यासाठी सरकारकडून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. आज या ट्रेनच्या माध्यमातून जवळपास देशभरातून १३ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त मजूर आपल्या राज्यात परतले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.

आतापर्यंत जवळपास १३ लाख ५४ हजारांपेक्षाही अधिकजण १ हजार ०८१ श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे विविध राज्यांमधून उत्तर प्रदेशमध्ये परतले आहेत. ‘ अशी माहिती त्तर प्रदेशचे मुख्य सचिव (गृह) अवनिश अवस्थी यांनी एएनआयशी बोलताना दिली 

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढाता फैलाव पाहता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. परिणामी हातावर पोट असलेल्या कामरागांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. हाती काम आणि उपासमारीमुळे कामगारांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. या कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपल्या राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button