पिंपरी / चिंचवड

कागदपत्रांचा गैरवापर करून 18 जणांच्या नावाने घेतले कर्ज

पिंपरी l प्रतिनिधी

तिघांनी मिळून 18 जणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज घेतले. ते कर्ज संबंधितांना न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2020 ते 2 डिसेंबर 2020 या कालावधीत अनुकेशन कम्युनिकेशन आकुर्डी येथे घडली.

रोहिणी उमेश कळसकर (वय 44, रा. शाहूनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश खंडेलवाल, अमीर शेख, सद्दाम अन्वर आली शेख (रा. वाकड रोड, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि अन्य 17 जणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर वेगवेगळ्या बँकेतून कर्ज मंजूर घेतले. कर्जाची रक्कम फिर्यादी अथवा अन्य लोकांना न देता त्या पैशांचा गैरवापर केला. फिर्यादी यांच्या नावावर घेतलेले 60 हजारांचे कर्ज त्यांना न देता आरोपींनी स्वतः वापरून फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button