breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विधानपरिषद पोटनिवडणूक येत्या २९ नोव्हेंबरला होणार

मुंबई – काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य शरद रणपीसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून काल रविवारी या विधानपरिषद पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली.

शरद रणपिसे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत २०२४ मध्ये संपणार होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ९ ते १६ नोव्हेंबर दरम्यान नामांकन अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर २९ तारखेला मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते म्हणून शरद रणपिसे यांनी अनेक वर्ष जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या रिक्त जागेवर आता काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, पुण्यातून कॉंग्रेसचे मोहन जोशी यांच्यासह प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, तसेच प्रवक्ते पदावरून नाराज असेलेल्या सचिन सांवत यांच्या नावांची चर्चा आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button