ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतर्फे सदनिकांची सोडत, 112 लाभार्थ्यांना हक्काचे घर

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सहकार्याने जेएनएनयुआरएम बीएसयुपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये 112 लाभार्थींना सदनिकांचे संगणकीय सोडतीद्वारे वाटप करण्यात आले. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (बुधवारी) ही संगणकीय सोडत काढण्यात आली. संग्रामनगर येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या॑चे पुनर्वसन पिंपरी येथील विठ्ठलनगर येथील इमारतीमध्ये करण्यात आले आहे.चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये झालेल्या या सोडतीवेळी उपमहापौर हिराबाई घुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसेविका कमल घोलप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, प्रशासन अधिकारी श्रीनिवास कोळप यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये सदनिका प्राप्त झालेल्या लाभार्थींसाठी आजचा सोनेरी दिवस आहे. प्राप्त वास्तूसह इमारत स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी लाभार्थींची असून उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने स्वछाग्रही असावे. स्वतःच्या हक्काचे घर मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी महापालिकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून गृहयोजना राबवली”.”अनेकांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. सदनिकांमध्ये पुनर्वसन झालेल्या नागरिकांनी पत्राशेड सोडावी यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे. सदनिकाधारकांनी सोसायटी निर्मिती नंतर इमारतीची देखभाल ठेवली पाहिजे. याकरिता आवश्यक शुल्क देखील सभासदांनी भरले पाहिजे” असेही महापौर ढोरे म्हणाल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button