breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जाणून घ्या लक्ष्मीपूजन विधी आणि शुभ मुहूर्त

मुंबई – दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा केली जाते. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि सौभाग्याची देवी आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी विशेष चोपडीपूजन करून आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात.

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून अन्य रत्नांबरोबर देवी लक्ष्मी अवतीर्ण झाली. लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आणि आई तिरंगिनी यांची कन्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची पूजा करतात. लक्ष्मीपूजनावेळी अक्षतांचे अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक यांवर श्री लक्ष्मीची स्थापना करतात. त्यानंतर लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या खव्याचा नैव्यद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आसाममध्ये लक्ष्मीसोबत वाहन घुबड याचीही पूजा होते. स्वस्तिक, गोपद्म, कमळ, शंख, चक्र, लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत.

मुहूर्तानुसार आज प्रदोषकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करायचे आहे. रात्रीमानाचे पंधरा भाग केले तर एका भागाला ‘मुहूर्त’ म्हणतात. सूर्य मावळल्यापासून पुढे तीन मुहूर्त ‘प्रदोषकाळ’ मानला जातो. यावर्षी आज, गुरुवारी सायंकाळी ६.०३ पासून रात्री ८.३५ पर्यंत प्रदोषकाळ आहे. आज या वेळेत लक्ष्मी कुबेर पूजन करायचे आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button