ताज्या घडामोडीविदर्भ

युवा शेतकऱ्याचा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

नापिकी व नाल्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान, शासनाकडून आर्थिक मदत नाही

नागपूर : सतत होत असलेली नापिकी व नाल्याच्या पाण्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान त्यात विम्यासह शासनाकडून कुठलीच आर्थिक मदत मिळत नसल्याने हतबल झालेल्या युवा शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने अनुचित प्रकार टळल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे घडली असुन स्वप्नील बंडू कदम असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) शिवारात स्वप्नील कदम यांचे शेत असुन मागील वर्षीं झालेल्या पावसाळयात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतातील संपूर्ण पिके नेस्ताबुत झाली. पीक विमा कंपनी आणि तालुका प्रशासनाला याची माहिती दिल्यानंतरही पंचनामा करण्यासाठी कोणीच आले नाही. हीच स्थिती पुन्हा याही वर्षी पावसाने केल्याने कदम हवालदिल झाले. आज पर्यंत झालेल्या नुकसानीचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी वारंवार महसुल प्रशासनाकडे केली. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या निगरगट्ट प्रशासनाने या पीडित शेतकऱ्याला बेदखल केले. वारंवार मागणी करून आपली कोणीच दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने नुकसान भरपाई न मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी सहकुटुंब तहसील कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचे निवेदनातून सांगितले होते .

कोणताच अंकुश नसल्याने या बेलगाम कारभाराला केवळ मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचे सांगून आपल्याला आत्मदहन करण्यास ही नोकरशाही व राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासन हादरून गेले. शेतकऱ्याने सह परिवार आत्मदहन करण्याचे निवेदन देऊन सुध्दा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याने. अखेर आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शेतकरी कदम यांनी आपले वृद्ध आई वडील, पत्नी व मुलासह तहसील कार्यालय गाठून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखून पीडीत शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button