नागपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या नागपंचमीचे महत्व..

Nagpanchami 2025 | आज श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा असून वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जाणून घ्या नागपंचमीचे महत्व व कथा..
नागपंचमी सणाचे पौराणिक महत्त्व :
मान्यतांनुसार, आपली पृथ्वी शेषनागाच्या कवचावर आहे. भगवान विष्णू स्वतः क्षीरसागरातील शेषनागाच्या पलंगावर झोपतात आणि आपल्या सर्वांना माहित आहे की भगवान शिव आपल्या गळ्यात सापाचा हार घालतात.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर वासुदेवजींनी नागाच्या मदतीने यमुना पार केली. वासुकी नागनेही समुद्र मंथनाच्या वेळी देवतांना मदत केली. म्हणूनच सर्पदेवतेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि नाग पंचमीच्या दिवशी जे लोक सनातम धर्माला मानतात ते सर्व नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
दरम्यान, ‘नागाची पूजा करणे’ या विधीमागे नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागांचे महत्त्व समाजाला कळावे हा आहे.




