विजय माल्या आणि ललित मोदी लंडनमध्ये एकत्र पार्टी करताना
ललित मोदी त्यांचा ६३ वा बर्थडे लंडनमध्ये मोठ्या धमाकेदार पार्टीने साजरा
राष्ट्रीय : देशात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेल्या ललित मोदी यांनी नुकताच त्यांचा ६३ वा बर्थडे लंडनमध्ये मोठ्या धमाकेदार पार्टीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी एक घोटाळेबाज व्यावसायिक विजय माल्या देखील उपस्थित होते. ललित मोदी यांनी त्या रात्रीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात ते मेफेयरच्या मॅडॉक्स क्लबमध्ये एन्जॉय करताना आणि नाचताना दिसले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे अन्य मित्र देखील दिसले आहेत.
महागड्या ठिकाणी ठेवली पार्टी
ललित मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाची पार्टी जेथे साजरी केली ती जागा खास आहे. खास करुन पैशांच्या बाबतीत. कारण बातमीनुसार तेथील एका टेबलचा खर्च किमान 1,000 पाऊंड (सुमार 1.18 लाख रुपये) इतका येतो.
हेही वाचा – चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने अनुराधा साळुंके यांचा प्रचाराचा शुभारंभ !
व्हिडीओत काय दिसले –
फरार ललित मोदी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात बर्थडे साँग वाजत आहे. त्यात वारंवार ही ओळ ऐकायला येत आहे की जन्मदिन मुबारक हो ललित. हास्यचा बादशहा..क्लिपमध्ये ललित मोदी मित्रांनी,डिस्को लाईट्सने आणि उत्सवी सजावटीत घेरलेले आणि आनंद साजरा करताना आणि बेधुंद नाचनाता दिसत आहेत.
त्यांची पार्टनर रीमा बौरी हिला धन्यवाद देताना मोदी यांनी लिहीले की माझ्या जन्मदिनी मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत डान्स करताना किती सुंदर विकेंड झाला. तुम्ही, माझ्या जीवनातील प्रेम, काय शानदार पार्टी ठेवली होती.
विजय माल्या देखील सामील
देशातील आणखी एक फरार घोटाळेबाज विजय माल्या देखील या व्हिडीओत दिसत आहेत. भारतात गंभीर आरोपांचा सामना करत असलेले दोघे जण या समयी ब्रिटनमध्ये रहात आहे. मनी लॉड्रींग आणि फेमा कायद्याचे उल्लंघन संबंधीत ईडीच्या प्रकरणातील आरोपी असलेले ललित मोदी साल २०१५ मध्ये भारत सोडून पळाले. किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्ज बुडवल्या प्रकरणातील फरार आरोपी विजय माल्या याच वर्षी २०२१ च्या दिवाळखोरीच्या आदेशा विरोधात त्यांचे अपिल हरले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की भारतीय अधिकाऱ्यांनी एअरलाईनच्या कर्जाहून अधिक रक्कम वसुल केली आहे.




