Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान 20 मे रोजी दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 मे रोजी कोरोनामुळे प्रभावित दहा राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वगळून पंतप्रधान थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेणार आहेत. यात महाराष्ट्रासह दहा राज्यांतील 54 जिल्हाधिकार्‍यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विविध राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्गाने प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओदिशा आणि पुद्दुचेरीमधील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button