Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

सरकारला कळतच नाहीये, पूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय – राहुल गांधी

नवी दिल्ली – देशात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनाबळींचा आकडाही वाढतोय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलंय, ‘भारत सरकारच्या हे लक्षातच येत नाहीये की, आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे. मात्र समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे’, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. साधारण मागील दोन आठवड्यांपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांमध्ये विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. याचवेळी राहुल गांधी यांनी भारत सरकारला संपूर्ण लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button