ताज्या घडामोडीदेश-विदेश

तेलंगणातील रामयामपेट टीजी मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांना विषबाधा

नाश्तातील अन्नात पाल सापडली, ३५ मुलांना विषबाधा, उपचार सुरू

तेलंगणा : तेलंगणातील एका सरकारी शाळेत निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. मेडक जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात नाश्ता करून ३५ विद्यार्थी आजारी पडले आहेत. रामयामपेठ येथील टीजी मॉडेल स्कूलमधील ३५ विद्यार्थी नाश्ता करून अचानक आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. अन्नात पाल आढळल्याने ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील रामयामपेट येथील टीजी मॉडेल स्कूलमधील आहे. नाश्त्यात पाल पडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यात ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नव्हता. त्यामुळे पालीचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ काढता आला नाही. विद्यार्थी आजारी पडल्यानंतर त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. विद्यार्थ्यांना उपचारासाठी तात्काळ रामायमपेठेतील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शासकीय वसतिगृहातील स्वयंपाकी आणि सहाय्यक यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

यावर मेडक जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी सांगितले की, वसतिगृहाच्या काळजीवाहू आणि विशेष अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचणीसाठी नमुने गोळा केले. अन्न शिजवताना चुकून पाल पडली असल्याचा अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच अशा घटना रोखण्यासाठी शालेय किचनमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.

तर दुसरीकडे आता या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील अन्न सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान शालेय जेवणात असे जीव सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हैदराबादच्या जेएनटीयूएच सुलतानपूर कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीमध्ये उंदीर आढळून आला. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button