श्रीनिवास जाधव यांनी दहावी बोर्ड परीक्षेत 97.40 टक्के घेऊन घवघवीत यश प्राप्त
काळेवाडी येथे श्रीनिवास जाधव यांचा सत्कार संपन्न

पिंपरी-चिंचवड | लातूर शहरातील ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत श्रीनिवास दयानंद जाधव यांनी 97.40 टक्के घेऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे. श्रीनिवासचे वडील हे लातूर शहरांमध्ये रिक्षा चालक असून त्याची आई घर संभाळत असते. श्रीनिवासच्या यशाच्या मागे त्याच्या आई-वडिलांचा मोठा खारीचा वाटा आहे. श्रीनिवास वर केलेल्या संस्कारामुळे व शिक्षणामुळे आज त्याचे सर्व कौतुक होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी प्रभागात श्रीनिवास हा आपल्या नातेवाईकाकडे आला असताना काळेवाडी मधील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आण्णा नढे पाटील यांच्या वतीने श्रीनिवास यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनिवासला पेढे भरवून त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत आण्णा नढे पाटील यांनी श्रीनिवास जाधव यांनी परीक्षेत 97.40 टक्के घेऊन घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले. यावेळी योगेश जाधव, खंडू जाधव, योगेश गायकवाड, महावीर जाधव, विजय सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : अग्नितांडव.! हैदराबादमधील चारमिनारजवळच्या आगीत १७ ठार