breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडा

मराठवाड्यात राजकीय घडामोडींचा वेग ! धनंजय मुंडे मनोज जरांगेंच्या भेटीला

Dhananjay Munde :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घटना दिसून येत आहेत . त्यातच कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली आहे.  सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती खुद्द मनोज जरांगे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून, त्या अगोदर दोघांमधील भेट महत्त्वाची मानली जाते. काल परळीमधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवाली मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा – FACT CHECK : पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा भामा आसखेड पाणी प्रकल्प लांबणीवर का पडला? 

धनंजय मुंडे यांनी भेटीचा इन्कार केला असला, तरी मनोज जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला. जरांगे पाटील यांनी सांगितले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या तीन वाजता ते आले असतील. आमच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही, त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार असल्याचे ते म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, मी माझ्या मुद्यांवर ठाम असून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते फक्त ओबीसीतून कायम ठाम असणार आहे. ज्यावेळी आमची आरक्षण संदर्भात चर्चा झाली तेव्हा व्यासपीठावर धनंजय मुंडे सुद्धा होते. घोंगडी बैठक परळीत होत असून आणि ती ताकदीने होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा असल्याचे जरांगे म्हणाले. आंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकतं तो आमचा पाहुणा आहे. मला इथं मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते, असे जरांगे म्हणाले. मी जातीवादी नसल्याचे जरांगे यांनी नमूद केले.

मनोज जरांगे यांनी सांगतिले की, कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चांगलं काम करायला लागली, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावर चर्चा झाली. मला आरक्षणाशिवाय दुसरी वेळ नाही. समोरील व्यक्तीचं वेगळं असतं आणि माझं वेगळंच असतं असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button