breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

New Parliament Building | संसदेच्या नव्या इमारतीला गळती, व्हिडिओ व्हायरल

New Parliament Building | भारतीय संसदेच्या इमारतीचं काही महिन्यापूर्वी बांधकाम झालं आहे. पण, याच नव्या संसदेच्या इमारतीला गळती लागल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे तामिनाडूमधील खासदार मनिकम टागोर यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यंदाच्या पावसाळ्यात देशाच्या नव्या संसदेत काय परिस्थिती उद्भवली आहे, हे दिसून येत आहे. या व्हिडीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीमध्ये चक्क पाणीगळती होत असल्याचं दिसत आहे.

मणिकम टागोर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपती वापरत असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी इमारत बांधून नुकतेच एक वर्षे झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करणार आहे.

हेही वाचा      –       चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा 

भारताच्या नव्या संसदेचे उद्घाटन २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जुन्या संसदेचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ साली करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज याच जुन्या इमारतीमध्ये सुरु होते. पण, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी नव्या इमारत बांधणीचा प्रकल्प हाती घेतला होता. मोदींनी ‘शेंगोल’ स्थापन करून नव्या इमारतीचे उद्घाटन केले होते. यावेळी साधू-संतांसह अनेक जण उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button