मुस्लीम समाजातर्फे शहरात कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण
भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणा

सटाणा : पहलगाम येथे दशहतवादी हल्ल्यात २६ भारतीय निष्पाप नागरीकांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येचा निषेध करीत येथील मुस्लीम समाजातर्फे शहरात कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
काल शनिवार (ता.२६) रोजी सायंकाळी येथील जामा मशिद पासून मुस्लीम समाजातर्फे कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चचा समारोप शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तानच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जामा मशिदीचे मौलाना नुरी, फईम शेख आदींनी मनोगत व्यक्त केलेत.
हेही वाचा – तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार
कँडल मार्च मध्ये माजी नगरसेवक मुन्ना शेख, मुन्ना रब्बानी, सरपंच अल्ताफ मुल्ला, मौलाना कासीम रजा, मौलाना जफर आबिद, मौलाना मुद्दसिर, आरिफ मन्सुरी, फईम शेख, मुन्ना शेख, यासीर शेख, मोसमी शेख, सलीम मन्सुरी, शाबीर तांबोळी, बबलू शेख, शकील मन्सुरी, शाहरुख पटेल, साबीर तांबोळी, नदीम शेख, मोसीम शाह, सईद मुल्ला, रिजवान सैय्यद, वसीम मन्सुरी, शरीफ तांबोळी, एजाज शेख आदीसह मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.