ताज्या घडामोडीराष्ट्रिय

जयपूरमधील कर्धनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पुलावर भीषण अपघात

ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट रस्त्याच्या खाली पाण्याच्या टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर पडला

जयपूर : देशभरात अपघात घडल्याच्या दररोज अनेक घटना दररोज समोर येतात. काही अपघाताच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही घटना इतक्या भयानक असतात की ते पाहूनच अंगावर काटा येतो. अनेकवेळा गाडी चालवताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलेलं असतं. अनेकदा भरधाव वेगाने धावणाऱ्या एखाद्या गाडीने दुचाकीवरील व्यक्तीला फरपटत नेल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत.

काही घटना तर अंगावर काटा आणणाऱ्या आणि थरकाप उडवणाऱ्या असतात. आताही एक अशीच भीषण अपघाताची घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली आहे. जयपूरमधील कर्धनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. ही घटना एका ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताचा थरारक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय?
राजस्थानमधील जयपूरमध्ये एका एक्स्प्रेसवेवर अचानक एका ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट रस्त्याच्या खाली दुसऱ्या बाजुला सर्व्हिस रोडवरील पाण्याच्या टँकर घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरवर पडला. सुमारे २० फूट उंचीवरून ट्रक पाण्याच्या टँकरवर पडला. यानंतर लगेच मोठा आवाज झाल्यामुळे रस्त्यावरील लोकंही घाबरले. या अपघातात टँकर चालक जखमी झाला आहे. आता अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कैद झाला असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आज सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान या अपघाताची घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, टँकर चालकाला उपस्थित लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, या अपघाताची घटना घडल्यानंतर कोणाला काही समजण्यापूर्वी ट्रकचालक संधी साधून घटनास्थळावरून पळून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-अजमेर एक्सप्रेसवेवर कल्व्हर्टवरून एक रिकामा ट्रक अजमेरच्या दिशेने जात होता. मात्र, भरधाव वेगामुळे चालकाचं ट्रकवरील नियत्रंण सुटलं आणि ट्रक थेट २० फूट खोल खाली दुसऱ्या बाजुला सर्व्हिस रोडवरील एका पाण्याच्या टँकरवर पडला. या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवत वाहतूक सुरळीत केली. आता पोलीस फरार ट्रक चालकाचाही शोध घेत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button