आसाममध्ये भारतीय वायू दलाचे AN-32 विमान कोसळले; ५ जवानांचा मृत्यू

Indian Air Force Plane Crash | आसाममधील जोरहाट येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे (IAF) ‘एएन-३२’ (AN-32) हे मालवाहू विमान शनिवारी सकाळी जोरहाट येथील लष्करी तळावर उतरत असताना भीषण अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत हवाई दलाच्या ५ जवानांचा मृत्यू झाला असून, एक सह-वैमानिक (Co-pilot) गंभीर जखमी झाला आहे. जखमी सह-वैमानिकाला तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हवाई दलाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून या भीषण अपघाताची माहिती देत जवानांच्या वीरमणाची घोषणा केली आहे.
प्राथमिक अहवालानुसार, हे मालवाहू विमान जोरहाट एअरबेसवर लँड होत असतानाच त्याला अचानक भीषण आग लागली. विमान धावपट्टीवर उतरत असताना आग लागल्याचे निदर्शनास येताच एअरबेसमधील आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशामक दलाने तात्काळ विमानाची दिशा पकडली. मात्र, आग एवढी भीषण होती की यामध्ये ५ जवानांना आपले प्राण गमवावे लागले. विमानाला आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा
BJP ने ब्राम्हण समाजात स्वीकृत नगरसदस्य पदाची संधी द्या : डॉ. सचिन बोधनी
वायूदलाच्या ५ जवानांचा अपघातात मृत्यू
हवाई दलाने ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये या अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांची नावे हवाई दलाकडून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टिनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांनी कर्तव्य निभावताना आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. या अत्यंत दुःखद आणि वेदनादायी प्रसंगी भारतीय हवाई दल शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या शोकाकुल परिवाराप्रति तीव्र संवेदना व्यक्त करत आहे, असे हवाई दलाने म्हटले आहे.
हवाई दलाकडून ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश
इस भीषण अपघातानंतर भारतीय हवाई दलाने तातडीने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे (Court of Inquiry) आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागली की यामागे इतर काही कारण होते, याचा सखोल तपास करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. तपास यंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून, अपघाताचे नेमके आणि सविस्तर कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंची तपासणी केली जात आहे.





