ताज्या घडामोडीराष्ट्रिय

आयकर वाचवण्यासाठी राहिले काही दिवस

31 मार्चपूर्वी गुंतवणूक करावी लागणार

राष्ट्रीय : देशातील आयकर भरणाऱ्या लोकांची आता कर वाचवण्यासाठी धावपळ सुरु आहे. आयकर वाचवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. कर वाचवण्याचे काही चांगले उपाय आहे. त्यामुळे केवळ करच वाचणार नाही तर गुंतवणूकही होईल. त्यासाठी 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे आयकर नियमाच्या सेक्शन 80सी मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 साठी तुम्हाला सुट मिळेल. ही सुट 1.5 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. ही सुविधा केवळ आयकरची जुनी प्रणाली स्वीकारणाऱ्यांना मिळणार आहे.

कर वाचवण्यासाठी बँकेत 5 वर्षांची कर बचत बँक ठेव देखील केली जाऊ शकते. ज्यामध्ये 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. मात्र, या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षापूर्वी पैसे काढता येत नाही. इतर काही योजना आहेत, पाहू या…

कोणत्या आहेत योजना

सुकन्या समृद्धी योजना: आयकर वाचवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY योजना हा एक चांगला पर्याय आहे. परंतु ही योजना ज्यांना मुली आहेत, त्यांच्यासाठीच आहे. लोक त्यांच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात. या योजनेत गुंतवणुकीवर 8.2% व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजनेसाठी उघडलेल्या खात्यात 250 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येत नाही. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर नाही.

हेही वाचा –  ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

ज्येष्ठ नागरिक बचत योजना: 60 वर्षांवरील लोकांसाठी कर वाचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि 1,000 ते 30 लाख रुपये गुंतवता येते. त्यामुळे 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचू शकतो. या योजनेवर 8.2% दराने व्याज मिळते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी: आयकर वाचवण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा सर्वात प्रचलित उत्तम पर्याय आहे. पीपीएफवर 7.1% व्याजदर मिळत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी पीपीएफवरील व्याजदराचा आढावा घेते. पीपीएफमध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

नॅशनल सेव्हिंग स्कीम : नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC ही देखील कर वाचवण्यासाठी चांगली योजना आहे. यामध्ये किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. या योजनेत 5 वर्षापूर्वी पैसे काढता येणार नाहीत. या योजनेवर 7.7% मिळते. पाच वर्षानंतर तुमचे खाते मॅच्योर होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button