हिंदू धर्मग्रंथांमध्ये, प्रदोष व्रत महादेवाला समर्पित
महादेवाला काही विशेष वस्तू अर्पण केल्यास व्यवसायात इच्छित यश आणि लाभ होतो.

पुणे : प्रदोष व्रत हिंदू धर्मात विशेष मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येते. ज्या दिवशी प्रदोष व्रत असते त्या आठवड्याच्या दिवसावरून प्रदोषाचे नाव असते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये, प्रदोष व्रत महादेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवशी महादेवाची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होते. या दिवशी प्रदोष काळात पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने जीवनात धन आणि आनंद वाढतो. असे मानले जाते की या दिवशी पूजेच्या वेळी महादेवाला काही विशेष वस्तू अर्पण केल्यास व्यवसायात इच्छित यश आणि लाभ होतो. जाणून घेऊ त्या खास गोष्टी कोणत्या आहेत.
हेही वाचा – बोपदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांची सुरक्षा ‘बळकट’, राज्य सरकारकडून ८० कोटींचा निधी मंजूर
कधी आहे प्रदोष?
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:47 वाजता सुरू होईल. तसेच 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता समाप्त होईल. यामुळे प्रदोष व्रत 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी मंगळवार आहे त्यामुळे याला भौम प्रदोष असे म्हटले जाईल.
या वस्तू शिवलिंगाला अर्पण करा
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला दूध, दही, मध इत्यादी अर्पण करावे. तसेच मंत्रांचा जप करावा. असे मानले जाते की या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने आणि मंत्रोच्चार केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने व्यवसायात वृद्धी होते.
प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगाला गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने व्यावसायिकाला अपेक्षित नफा मिळतो.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. आर्थिक फायदाही होतो.
शिवलिंगावर तुळस, हळद आणि कुंकू चुकूनही अर्पण करू नये. असे मानले जाते की यामुळे महादेव क्रोधित होतात.