Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिकमध्ये २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात करोनाचे २४ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाशिकचे १२ आणि मालेगावच्या १२ जणांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मालेगाव शहरात ७ नवीन तर पाच आधीपासून बाधित रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ३१६ पोहोचली आहे. तर मालेगाव शहरातील एकूण रुग्णांची संख्या २८२वर पोहोचली आहे.