Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | चीनच्या हार्बिन शहरात आढळून आले 70हून जास्त रूग्ण

बीजिंग | चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. यावेळी वुहान शहरात नाही तर हार्बिन शहराला कोरोनाने आपलं केंद्र बनवलं आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून 1 हजार 240 किलोमीटर दूर असलेलं हार्बिन शहरामध्ये 70 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

हार्बिन हे चीनमधील हेलॉन्गजियांग प्रांताची राजधानी आहे. येथील लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे. 53 हजार 523 वर्ग किलोमीटर परिसरात वसलेल्या या मोठ्या शहरात 131 जिल्हे, 107 तालुके, 62 टाऊनशिप आणि 1 हजार 879 गावं आहेत. आकाराने हार्बिन भारताच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीहून 36 पटिंनी मोठं आहे. या शहरात 70 रूग्ण समोर आल्यानंतर चीन शहर लॉकडाऊन केलं आहे. हार्बिनमध्ये ज्या 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या नातेवाईकांवर नजर ठेवण्यात येत आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी शेकडो लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. हार्बिनमध्ये फक्त त्याच लोकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांनी कोरोना अॅप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केलं आहे आणि ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button