breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | औरंगाबादेत आज 26 रुग्णांची वाढ, एकूण 1212 कोरोनाबाधित रुग्ण
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1212 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जयभीम नगर (5), गरम पाणी (2) रेहमानिया कॉलनी (2) कवरपल्ली, राजा बाजार (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर (1) न्याय नगर (4), भवानी नगर, जुना मोंढा (2), रहीम नगर, जसवंतपुरा (1), पुंडलिक नगर, गल्ली नं. 10 (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (3) एन -2 सिडको (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरूष आणि 10 महिला आहेत.