काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचा तपास, अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात
सोशल मीडियावर मैत्री, शारीरिक संबंध आणि मग ब्लॅकमेलिंग

दिल्ली : दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचा (Himani Narwal Murder Case) तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी 36 तासांच्या आत बहादुरगड येथील रहिवासी सचिन याला अटक केली. आरोपीकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले असून तो मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानाचा मालक आहे. पोलिस चाैकशीतून हे स्पष्ट झाले की, हिमानी आणि सचिन हे रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी आरोपीकडून हिमानीचे दागिने आणि फोनही जप्त केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी एकमेकांना जवळपास एक ते दीड वर्षांपासून ओळखत होते. सचिन हिमानीच्या घरी कायमच येत बऱ्याचदा तो तिथे मुक्कामासाठीही राहत. सचिनचे अगोदरच लग्न झाले होते आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक हिमानीचा मृतदेह बस स्टँडवर एका बॅगमध्ये आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाली.
हेही वाचा: ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
सचिन आणि हिमानी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. तिने सचिनला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध निर्माण झाले. हैराण करणारे म्हणजे याचा व्हिडीओ हिमानी हिने बनवला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून ती सचिनला ब्लॅकमेल करत होती. तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम सचिनने हिमानीला दिली होती. ती आपल्यावर पैशांसाठी सतत दबाव टाकत असल्याचे पोलिसांना सचिनने सांगितले.
सचिनने पोलिसांना चाैकशी सांगितले की, २ मार्चला निवडणुका होता. हिमानीने आपल्याला तिच्या घरी बोलावले होते. हिमानी सचिनकडे पैशांची मागणी करत होती. यावेळी बराचवेळ सचिनने तिला समजावले. मात्र, ती ऐकण्यास तयार नव्हती. रागाच्या भरात सचिनने हिमानीचा गळा दाबून खून केला. हिमानीच्या खूनानंतर (Himani Murder Case) सचिन बहादूरगड गावातील त्याच्या दुकानावर गेला. तो त्यानंतर हिमानीच्या घरी गेला आणि तिचा मृतदेह बॅगमध्ये भरला रिक्षातून त्याने बसस्थानकापर्यंत नेला. हिमानी यांच्या हत्येनंतर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आली होती.