चीन, अमेरिकेची छुपी रणनीती अचूक युद्धनीतीमुळे चव्हाट्यावर !

प्राथमिक शाळेत असताना आमचे एक गुरुजी गोष्ट सांगायचे..उशिरा का होईना ती आज तंतोतंत पटली..एक बस प्रवासाला निघाली होती.. प्रवासी होते मोठ-मोठे बुद्धीवंत, विचारवंत, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, साहित्यिक, बुजूर्ग राजकारणी.. फक्त त्या बसचा ड्रायव्हर हा थोडा एक कल्ली, वेडसर होता.. ती बस हमखास एखाद्या घाटात कोसळणार..बसमधील प्रवासी अतिशय बुद्धिवंत असून काहीही उपयोग नाही..याउलट एका बसमध्ये ३५-४० वेडे भरले.. आणि त्या बसला अतिशय चलाख, तरबेज ड्रायव्हर मिळाला, तर ती बस योग्य ठिकाणीच पोहोचणार !
चलाख, तरबेज ड्रायव्हरमुळे..
आज भारताची अवस्था अशी झाली आहे..भारताची गाडी चालवणारा ड्रायव्हर म्हणजे नरेंद्र मोदी अतिशय तरबेज आणि युद्धनीतीमध्ये पारंगत आहेत, फक्त प्रवास करणारे विरोधी पक्षाचे नेते डोक्यावर पडल्यासारखी वक्तव्ये करीत आहेत.. त्यांना ना देशप्रेम आहे, ना देशाच्या सुरक्षेची काळजी !
अनेक जुने गुपिते उघड..
दि. २२ रोजी पहेलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि फक्त २२ तासात भारताने उचललेली युद्धनीतीची अचूक पावले खूप काही शिकवून गेली! त्यामुळे, खूप जुनी गुपिते उघड झाली ! हे रहस्य इतके खोल आहे आणि ते चव्हाट्यावर आले आहे, ते ऐकून आपला भारतच नव्हे तर संपूर्ण जग थक्क होईल!
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरची वस्तुस्थिती..
त्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ची कारवाई..! भारतीय लष्कराला अफाट यश मिळाले तर पाकड्यांचे मनसुबे पार धुळीला मिळाले..समाधानाची बाब एवढीच की पाक पूर्णपणे धुळीला मिळता मिळता वाचला. नंतर जे खुलासे झाले, ते केवळ पाक पराभवाची कहाणी नव्हते.. वस्तुस्थितीचा अभ्यास केला तर अमेरिकेची छुपी रणनीती आणि चीनची भागीदारी देखील उघडी पडल्याचे लक्षात येते..याला कारणीभूत भारताची फक्त अचूक युद्धनीती !
पाकड्यांकडे स्वतःचे अणवस्त्रच नव्हते..
खरे तर, आता हे स्पष्ट झाले आहे की पाककडे स्वतःचे कोणतेही अण्वस्त्र नव्हते. पाकिस्तान काही दशकांपासून दाखवत असलेली अणुशक्ती आणि त्या जोरावरच्या अणवस्त्र हल्ल्याच्या बाता प्रत्यक्षात अमेरिकेची गुप्त तिजोरी होती, जे १९९८ मध्ये पाकिस्तानात लपवले होते. अमेरिकेला हे ठिकाण योग्य वाटले, कारण जर कधी हल्ला झाला तर त्याचे नुकसान अमेरिकेला नाही तर आशियाला होईल, हा त्यामागील कारस्थानाचा भाग असावा !
हेही वाचा – नांदेडमध्ये भाजपचा ‘शंखनाद’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
अण्वस्त्रांची नुसती पोकळ भीती..
थोडसं इतिहासात बघा..१९९८ मध्ये जेव्हा भारत अणुचाचण्या करत होता आणि अमेरिका धमक्या देत होती, तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला चाचण्या करायला लावल्या आणि जगाला मूर्ख बनवले, की आता पाकिस्तानदेखील एक अणुशक्ती म्हणजेच अण्वस्त्रधारी देश आहे. एवढेच नाही तर पाकच्या या बनावट अण्वस्त्र प्रतिमेने भारताला घाबरवण्याचा खेळ सुरू झाला, ज्यामध्ये देशात बसलेले अमेरिकन अनुयायीदेखील पाकिस्तानच्या सामर्थ्याची भीती निर्माण करत राहिले !
कणखर, खंबीर, दूरदृष्टीचे नेतृत्व..
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आता काळ बदलला आहे, आणि सत्ता अशा धीरगंभीर, खंबीर, कठोर निर्णय घेणाऱ्या आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या हातात पोहोचली आहे जो घाबरत नाही, जो साद मागतो आणि प्रतिसाद देतो.. लक्षात घ्या, की नरेंद्र मोदी सरकारने प्रथम भारताला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवले, अमेरिकेशी मैत्री केली, चीनसाठी मैत्रीचा हात पुढे केला आणि पाकिस्तानकडे संयमाने पाहिले.
पहलगामचे मोठे आव्हान..
सुरक्षित असलेले भारतीय नागरिक शांतपणे जीवन जगत आहेत, त्यावेळी ‘चौकीदार’ मात्र जागा असतो हे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले आणि पटवून दिले.जेव्हा पहलगाममध्ये हिंदूंचे रक्त सांडले, तेव्हा मोदी सरकारने असे काही अभूतपूर्व केले, जे कोणालाही अपेक्षित नव्हते. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर थेट हल्ला..भारतीय सैन्याने क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचा पाया हादरवला आणि आमची हल्ला करण्याची क्षमता आतापर्यंत ‘अदृश्य’ मानल्या जाणाऱ्या अणु प्रतिष्ठानांपर्यंत पोहोचू शकते हे पाकिस्तानला नव्हे तर संपूर्ण जगाला आणि विशेषतः अमेरिकेला दाखवून दिले.
आणि अमेरिकेला जाग आली…
पाकिस्तान.. त्यांचे पालक चीन आणि अमेरिका यांना भीती होती की जर भारताने हल्ला सुरूच ठेवला तर त्यांची स्वतःची शस्त्रे नष्ट होतील आणि तो कधीही जगाला तोंड दाखवू शकणार नाही. आता अमेरिका बोलू शकत नव्हती आणि थांबवू शकत नव्हती. भारतापुढे नम्र होण्याशिवाय दुसरा पर्याय अमेरिकेकडे नव्हता.
युद्धविरामाची घोषणा, भारताच्या फायद्याची..
पंतप्रधान मोदीनी परिस्थितीची नाजूकता समजून घेतली, चार दिवसांत शत्रूचा पराभव केला आणि अटींसह युद्धबंदीची घोषणा केली. संपूर्ण जगासमोर पाकिस्तान उघडा पडला आणि अमेरिकेला शांतपणे आपला अण्वस्त्रसाठा मागे घ्यावा लागला. भारताने एका क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन देशांना घायाळ करून टाकले होते..
सध्या काय चालू आहे ?
आज अमेरिका पाकमधून अण्वस्त्रे काढून टाकण्याच्या कवायतीत गुंतली आहे. मोदींनी स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या कामाची आठवण करून दिली आहे. आता अमेरिका झुकली आहे, चीन गप्प आहे, आणि पाकिस्तान हादरला आहे, हे चित्र संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.
पाकड्यांची नव्हे, अमेरिकेची शरणागती!
आता खरे तर, अमेरिका पाककडून आपली अण्वस्त्रे मागे घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे आणि आपली विश्वासार्हता वाचवण्यासाठी ते त्याला पाकिस्तानची अणु शरणागती असे नाव देईल.. जगाला तोंड दाखवायला जागा आहे का? अरे अमेरिकन नेत्यांनो आणि नागरिकांनो ! आता सर्वांना माहीत आहे, की पाककडे अणुशक्ती नव्हती, मग ते शरणागती का मानेल ? जे अमेरिकेचं आहे, ते घेऊन जा, अशी त्यांची भूमिका आहे.
या चार दिवसांच्या लढाईने भारताला एक नवीन दर्जा दिला आहे, जागतिक पातळीवर भारत ही मोठी ताकद म्हणून पुढे आला आहे. आता भारत केवळ एक देश नाही तर एक जागतिक शक्ती आहे, जी परिणाम देते. भारताच्या नादी लागण्यात अर्थ नाही हेच नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.
चला तर, गुरुजींनी सांगितलेल्या मूळ गोष्टीकडे जाऊ.. जेव्हा नेतृत्व मजबूत असते तेव्हा जग नतमस्तक होते.. अमेरिका आणि चीनची छुपी रणनीती उद्ध्वस्त करून भारताने आपली युद्धनीती जगाला कशी नमवू शकते, हेच जगाला दाखवून दिले आहे, हे मात्र खरे !