‘₹’ चिन्ह बदलने म्हणजे ‘अलिप्ततावादी भावने’चे संकेत

Nirmala Sitaraman : हिंदी भाषेवरुन तामीळनाडू व केंद्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यातच आता तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने आपल्या अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह बदलले आहे. यावरुन केंद्र व राज्यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी तामिळनाडू सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. रुपयाचे चिन्ह बदलने म्हणजे ‘अलिप्ततावादी मानसिकता’ असल्याची टीका त्यांनी केली आहे
तामिळनाडूने २०२५ – २६ चे बजेट सादर करताना रुपयाचे चिन्ह हटवले यावरुन सितारामण यांनी म्हटले आहे की २०१० मध्ये ज्यावेळी देशामध्ये युपीएचे सरकार होते. त्यावेळी हे चिन्ह वापरात आणले होते त्यावेळी त्यांनी यावर आक्षेप का नोंदवला नाही. एक्सवर पोस्ट करत त्यांनी तामिळनाडू सरकारला जाब विचारला आहे. ‘२०१० मध्ये युपीए सरकारचा एक घटकपक्ष म्हणून डीएमके सत्तेत होता त्यावेळी त्यांनी या चिन्हावर आक्षेप घेतला नाही. महत्वाची बाब म्हणजे डीएमकेचे माजी आमदार एन. धर्मलिंगम यांचे पुत्र टी.डी. उदयकुमार यांनी या चिन्हाचे डिझायन केले आहे. पण आता तामिळनाडू सरकारने चिन्ह न वापरल्याने राष्ट्रीय प्रतिक मिटवण्याचा प्रयत्न करत आहे.’
हेही वाचा – IIT नंतर आता मुंबईत IICT, ४०० कोटी मंजूर; कशी असेल ही संस्था?
पुढे त्यांनी म्हटले आहे की ‘रुपई’ या तमिळ शब्दाचा संस्कृत शब्द ‘रुपया’शी संबध आहे, याचा अर्थ ‘चांदी चा शिक्का’ असा होतो. त्यामुळे हा शब्द तामिळमधील व्यापार, साहित्य व संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेला आहे. ‘रुपई’ तामिळनाडू बरोबरच श्रीलंकेमध्येही प्रचलित आहे. तसचे इंडोनेशिया, मालदीव, मॉरेशिअस, नेपाळ व सेशेल्समध्येही ‘रूपया’ हाच शब्द चलनासाठी प्रचलित आहे. तसेच रुपयासाठी असलेले ‘₹’ हे चिन्ह आंतराराष्ट्रीय स्तरावर चांगल्याप्रकारे ओळखले जाते. तसेच या ‘₹’ चिन्हामुळे वैश्विक स्तरावर रुपयाला चांगली ओळख बनवता आली आहे. युपीआय हे पेमेंट ॲप आता इतर देशातही वापरण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे अशावेळी आपल्याच प्रतिकाला कमजोर करावे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पुढे म्हटले की ‘देशभरातील सर्व निवडून येणारे पदाधिकारी व अधिकारी देशाचे सार्वभौम आणि अखंडता टिकून राहावी यासाठी शपथ घेतात. आणि ‘₹’ यासारख्या राष्ट्रीय प्रतिकाला हटवने म्हणजे या शपथेच्या विपरीत काम करणे होय. अशा घटना राष्ट्रीय एकतेच्या धोरणाला कमजोर करतात. अशा प्रकारे राष्ट्रीय प्रतिकांशी छेडछाड करणे म्हणजे अलिप्ततावादी धोरणाचा संकेत आहे. व त्यामुळे भारताच्या एकात्मतेला बाधा पोहचू शकते. एकात्मतेच्या धोरणाला बाधा आल्याने प्रादेशिक व अलिप्ततावादी भावनांना चालना मिळू शकते.’ असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘₹’ या चिन्ह देवनागरी ‘र’ व रोमन अक्षर कॅपिटल ‘आर’ या दोन्हींचे मिश्रण आहे. चिन्हाच्या वरील दोन संमातर रेषा या राष्ट्रीय ध्वज आणि ‘बरोबर’ या गणितातील चिन्हाचे प्रतिनिधीत्व करतात. हे चिन्ह भारत सरकाने १५ जुलै २०१० साली स्विकारले.