बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढ
शेख हसीना भारताच्या आश्रयाला

आंतरराष्ट्रीय : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात (ICT) अभियोक्ता पक्षाने गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या सरकारविरोधातील उठवादरम्यान केलेली कारवाई ही मानवतेविरुद्ध गुन्हा असल्याचा ठपका ठेवला आहे. अभियोक्त्याने रविवारी याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. जर शेख हसीना यांच्या सरकारविरोधात हे आरोप सिद्ध झाले तर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. या दोषारोपपत्रात शेख हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी IGP चौधरी मामून हे सह आरोपी आहेत. या खटल्याचे बांगलादेशातील टीव्हीवर थेट प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणात पारदर्शकता कायम असेल.
12 मे रोजी सादर केला अहवाल
शेख हसीना यांच्यावर लावलेल्या आरोपात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात पसरलेला हिंसाचार आणि त्यानंतर पोलिसांनी केलाला गोळीबार, सामूहिक हत्याकांड करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 12 मे रोजी तपास अधिकाऱ्यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये शेख हसीना यांचा या हत्याकांडामागे हात असल्याचे म्हटले होते. त्यांनीच याविषयीचे आदेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या न्यायाधिकरणात हा खटला सुरू आहे. ते पाकिस्तानातून स्वतंत्र झाल्यानंतर पाक सैनिकांवर खटला चालवण्यासाठी सुरू करण्यात आले होते. या न्यायाधिकरणात यापूर्वी जमात आणि BNP नेत्यांविरोधात खटले चालवण्यात आले आहेत. त्यांना मृत्यूदंड पण ठोठावण्यात आला आहे.
शेख हसीना भारताच्या आश्रयाला
तख्तापालट नंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. देशात एका खास गटाने सत्ता उलटण्यासाठी हिंसाचार घडवून आणला होता. त्यानंतर हसीना यांनी भारतात पलायन केले. बांगलादेशातील सध्याचे युनूस सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवण्याची मागणी करत आहे. पण भारताने त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारत आणि शेख हसीना यांच्या संबंध पक्के होते. युनूस सरकार हे पाकिस्तानच्या हातातील कठपुतली आहे. ते चीन धर्जीणे आहे. ज्या भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. तिथले मुल्ला-मौलवी आता भारताविरोधी भाषा करत आहेत.