DeepSeek च्या आगमनामुळे चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रात बंपर वाढ
चीनच्या शेअर बाजारात जवळपास 1.3 ट्रिलियन डॉलरची वाढ , चिनी शेअर बाजार समृद्ध

चीन : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दिशेने एक पाऊल टाकत चीनने संपूर्ण देशाची परिस्थिती बदलून टाकली आहे. शेअर बाजारात बंपर उसळी पाहायला मिळाली. गुंतवणूकदार श्रीमंत झाले. चीनने आदल्या दिवशी DeepSeek नावाचे AI लाँच केले, त्यानंतर देशाचा शेअर बाजार रॉकेट बनला. DeepSeek हे चीनसाठी खासच बनले आहे, ज्यामुळे चिनी शेअर बाजार समृद्ध झाला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ChatGPT, Google Gemini सारख्या AI मॉडललाही या चीनी मॉडेलने मागे टाकलं आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, DeepSeek लाँच झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात चीनच्या शेअर बाजारात जवळपास 1.3 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. DeepSeek च्या आगमनामुळे चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रात बंपर वाढ झाली. चिनी टेक शेअर्समध्ये सातत्याने तेजी आहे. त्याचवेळी याच भारतीय बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार विक्री आणि अमेरिकेच्या शुल्काचा दबाव हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
AI ची इकोसिस्टम
अहवालानुसार, चीनच्या ऑनशोर आणि ऑफशोर इक्विटी मार्केटचे मूल्य गेल्या महिन्याभरात 1.3 ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. चीन DeepSeek सह AI क्षेत्रात आपली संपूर्ण इकोसिस्टम तयार करत आहे आणि येत्या काळात त्यावर AI क्षेत्राचे वर्चस्व असेल. असा अंदाज बांधला जात आहे. सखोल घडामोडींमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा : सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार; राधाकृष्ण विखे पाटील
चिनी शेअर्समधील गुंतवणुकीत वाढ
DeepSeek मधून आल्यानंतर येत्या काळात तिथला शेअर बाजार आणखी वर जाईल, असे जाणकारांचे मत आहे. यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्राला अधिक चालना मिळू शकते. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, सर्वात मोठे सक्रिय आशियाई इक्विटी फंड आता भारतीय बाजारपेठेतील त्यांचे एक्सपोजर कमी करत आहेत आणि चीनमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.
2022 मध्ये जेव्हा OpenAI ने ChatGPT लॉन्च केलं होतं. तेव्हा या जनरेटिव्ह AI ची चर्चा सुरू झाली. मायक्रोसॉफ्टने प्रायोजित केलेल्या या AI टूलने गूगल, अॅपल आणि मेटा सारख्या दिग्गज कंपन्यांचं टेन्शन वाढवलं आहे.
ChatGPT आल्यानंतर या कंपन्यांनी त्यांचा जनरेटिव्ह AI मॉडल लॉन्च केला होता. त्याचे दोन वर्षातच लाखोंच्या घरात यूजर्स आहेत. आता चीनी कंपनीच्या नवीन AI मॉडलने सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. चीनी स्टाटर्टअप कंपनी DeepSeekच्या नव्या AI मॉडलवर मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नडेला यांनीही भाष्य केलं आहे.