संजय राऊत अन् देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. दरम्यान, भाजप मधील नेत्यांनी राजकारणात काहीही शक्य आहे.
मात्र, ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने शंकेला वाव असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी तब्बल दोन तास चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. हॉटेलमध्ये याविषयी कोणालाही न सांगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.