Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मोदी सरकार पाकिस्तानसोबत युद्ध छेडणार – दिग्विजय सिंह

जोधपूर : काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह हे नेहमी वादात सापडतात. पण यावेळेस त्यांचं वक्तव्य सीमेपार पोहोचलं आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की ‘मोदी २०१९ मध्ये सत्तेत येण्यासाठी पाकिस्तान सोबत युद्ध देखील करु शकतात.’
एका हिंदी वेबसाईटच्या बातमीनुसार एका खासगी कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जोधपूरमध्ये दिग्विजय सिंह यांनी हा आरोप केला. ‘देशाला पाकिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी तसं वातावरण तयार केलं जात आहे. भाजप सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण नाही करु शकत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा रस्ता नाही आहे. अशा स्थितीत मोदी सरकार पाकिस्तानसोबत युद्ध छेडू शकते. २०१९ च्या निवडणुकीसाठी तसं वातारवण तयार केलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे,’




