Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारत बंद : शेतकरी आंदोलनाला खतपाणी घालणारे काँग्रेस ढोंगी : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकरी शेती मालाला किंमतीवर मोबदला किंमत देण्याची मागणी करीत आहेत. मात्र, भाजपा सरकारने एकूण ५० टक्के मोबदला किंमत दिली आहे. याउलट काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
तसेच, काँग्रेसच्या काळात देशामध्ये करार शेतीबाबत कायदा करण्यात आला. त्याच आशयाचा कायदा भाजपाने केल्यावर काँग्रेस शेतकरी विरोधी कायदा म्हणून ढोंगीपणे आंदोलनाला खतपाणी घालत आहेत. विशेष म्हणजे, अशाच प्रकाराचा जाहीरनामा काँग्रेसने प्रसिद्धही केला होता, असेही जावडेकर यांनी म्हटले आहे.