Breaking-newsताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यांला सकाळपासून दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

नाशिक जिल्ह्यांला आज 8 सप्टेंबरला सकाळपासून दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास पहिला 3.8 रिश्टल स्केलच्या धक्क्यानंतर आता 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास दुसरा धक्का बसला आहे. दरम्यान हा धक्का देखील नाशिकच्या पश्चिमेकडील भागात 103 किमी दूर आहे. तसेच धक्क्याची तीव्रता ही 2.5 रिश्टल स्केलची आहे. अशी माहिती National Centre for Seismology ने दिली आहे.

दरम्यान आज पालघरमध्ये देखील काल आणि आज सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरीही घराला तडे गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का बसल्याने नाशिकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.





