Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! उत्तर प्रदेशात दोन साधूंची तलवारीनं हत्या; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले चौकशीचे आदेश

महाराष्ट्रातील पालघर येथील साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील मंदिरात दोन साधूचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.

नेमंक काय घडलं?

मेरठचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांनी घटनेविषयी माहिती दिली. “बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावात दोन साधूंची हत्या झाल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला नशा करण्याच व्यसन आहे. आरोपीने साधूंचा चिमटा चोरला होता. त्यामुळे साधू आरोपीवर रागावले. त्यातूनच आरोपीनं दोन्ही साधूंची सोमवारी तलवारीनं रात्री हत्या केली. आरोपीला घटनास्थळावरून तलावार घेऊन जाताना ग्रामस्थानी बघितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं. सध्या आरोपी नशेत असून शुद्धीत आल्यानंतर चौकशी केली जाईल,” असं सिंह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button