आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 जुलैपर्यंत बंद राहतील…

नवी दिल्ली | देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 4 लाख 91 हजार 861 वर गेला आहे. देशात गेल्या पाच दिवसांमध्ये 80 हजार रुग्ण वाढले. यामध्ये केवळ दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचेच 500701 रुग्ण आहेत. ही संख्या 70 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांमध्ये 19536, दिल्लीमध्ये 17034 आणि तामिळनाडूमध्ये 14131 संक्रमित आढळले आहेत.
दरम्यान, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल एविएशन म्हणजेच, डीजीसीएने शुक्रवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 जुलैपर्यंत बंदच राहतील. लॉकडाउनदरम्यान 23 मार्चला आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली होती. तिकडे, असामने गुवाहाटी आणि कामरूप जिल्ह्यात 14 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा 28 जूनपासून लागू होईल. यापूर्वी, गुरुवारी एका दिवसात सर्वात जास्त 18 हजार 185 संक्रमित वाढले. तर 13 हजारांपेक्षा जास्त बरे झाले. महाराष्ट्रामध्येही विक्रमी 4842 पॉझिटिव्ह आढळले. येथे आता 1.47 लाखांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6931 लोकांचा मृत्यू झाला आहे. डेथ रेट 4.69% आहे.