पिंपरी / चिंचवड
मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी l प्रतिनिधी
घरातील फ्रीजवर ठेवलेले तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एक लाख 40 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री नऊ ते अकरा या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.
तुषार जयवंत पोळ (वय 32, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 26) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरात फ्रीजवर तीन मोबाईल फोन आणि 10 हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातून एक लाख 30 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि 10 हजार रुपये रोख रक्कम असा एक लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.