ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक कार्याबद्दल लालबाबू गुप्ता यांना डॉक्टरेट(पीएचडी) पदवी बहाल

पिंपरी चिंचवड | विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांना सामाजिक कार्यात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. गुप्ता यांनी गेल्या अनेक वर्षांत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत या उच्च सन्मानाने नुकतेच त्यांना गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या एका सर्वसाधारण परिषदेत त्यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ द किंगडम ऑफ टोंगाकडून ही पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.लालबाबू गुप्ता गेल्या अनेक वर्षांपासून विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्यांच्या संस्थेने अनेक मुलींचे लग्न लावून दिले, तसेच समाजातील गोरगरीबांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील अनेक राज्यांत त्यांचे हे कार्य निस्वार्थीपणे सुरू आहे. शिक्षण, पर्यावरण संरक्षण, उपजीविका, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालविकास, ग्रामीण रोजगार, शेतकरी कल्याण, शेतकरी कल्याण, निष्पक्ष पत्रकारिता, संस्कृती संवर्धन-सुशासन अशा विविध क्षेत्रात लालबाबू सध्या कार्यरत आहेत.

राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र विकास आमचे ध्येय – गुप्ता

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.लालबाबू गुप्ता म्हणाले की, देशाच्या विविध भागांच्या दौर्‍यादरम्यान गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी खूप काही करण्याची गरज असल्याचे आम्हाला प्रकर्षाणे जाणवले. ग्रामीण भागातील गरिबांचे जीवनमान सुधारून त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्याची गरज आहे.
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला तरच सामाजिक विकास शक्य आहे.

म्हणूनच आम्ही आणि आमची टीम सतत या कामात गुंतलेलो आहोत. या कार्यामुळे आज मला डॉक्टरेट मिळणे हा माझा बहुमान समजतो. या पुरस्कारामुळे माझ्या कामाबद्दलचा उत्साह वाढला आहे. माझ्यात एक कमालीची ऊर्जा साकारली आहे. सामाजिक कार्याची जबाबदारी वाढेल. राष्ट्रीय एकता आणि राष्ट्र विकास हेच आमचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील गरिबांचा विकास आणि उन्नती हे आमचे स्वप्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button