breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगार नेते सचिन लांडगे यांचा ‘पर्यावरण मित्र पुरस्कारा’ने गौरव

  • नदी स्वच्छता, वृक्ष लागवडीच्या कामाची जलदिंडीकडून दखल

पिंपरी l प्रतिनिधी
टाटा मोटर्सचे युनियन अध्यक्ष व अविरत श्रमदान व सायकल मित्र संस्थापक तसेच नदी स्वच्छता अभियाना अंतर्गत रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजक कामगार नेते सचिन लांडगे यांचा ‘पर्यावरण मित्र पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. चिंचवड येथे झालेल्या जलदिंडीच्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सचिन लांडगे यांनी नदी स्वच्छतेसाठी, वृक्ष लागवडीसाठी राबविलेले विविध उपक्रम, नागरिकांचा प्रतिसाद आणि लांडगे यांच्या कामाला आलेले यश याचा ‘जलदिंडी’ने दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिला.
चिंचवड मधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम रविवारी (दि. 26) पार पडला. कार्यक्रमासाठी मावळ विभागातून विद्यमान सरपंच पुनम आल्हाट माळवंडी, धामणे गावचे सरपंच सोमेश गरा, सोमाटणे सरपंच स्वाती शेळके, वारु ब्राम्हणोली सरपंच शाहिदास निंबळे, सांगवडे सरपंच रोहन जगताप व योगेश चिंचवडे उपस्थित होते. तसेच, नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप माने, IICMR संचालक डॉ. अभय कुलकर्णी, नितीन कोतापल्ले, रुलर रिलेशन प्रदिप लोंखडे , निवृत आय. ए. एस. अधिकारी के. एन. नागरगोजे, ग्राम प्रबोधिनीचे संचालक व्यंकटेश भताने, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रवीण लडकत व ओंकार गौरीधर यांनी ‘पवनामाई निर्मळतेकडे’ या योजनेअंतर्गत ‘रिव्हर पोलीस’ या उपक्रमाची माहिती दिली. रिव्हर पोलीस उपक्रमाअंतर्गत पवना नदीतून चिंचवड घाट ते पवना धरण असा 32 किलोमीटर प्रवास करत नदीत होणा-या प्रदुषणाचा व तसेच जिवंत नाले यांचा शोध घेत त्यांच्या उगमस्थाना पर्यंत पोहचणे, जनजागृती करणे व सर्व अभ्यासाचा अहवाल जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, सी. ओ. व प्रदुषण महामंडळास सादर करण्यात येणार आहे.कार्यक्रमात पवनामाई पुरस्कार 2021′ चे वितरण करण्यात आले. जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. टाटा मोटर्सचे युनियन अध्यक्ष, अविरत श्रमदान व सायकल मित्र संस्थापक तसेच नदी स्वच्छता अभियाना अंतर्गत रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजक सचिन लांडगे यांना ‘पर्यावरण मित्र पुरस्कार 2021’ प्रदान करण्यात आला. ‘जलमित्र पुरस्कार’ विलु मॅथर प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेंमत वाटवे यांना देण्यात आला.

सचिन लांडगे हे सायकल मित्र, पर्यावरण प्रेमी म्हणून मागील सुमारे 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. इंद्रायणी नदी स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. रिव्हर सायक्लोथॉनच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण प्रेमींची मूठ बांधली आहे. हजारो पर्यावरण प्रेमी पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी त्यांनी जोडले आहेत. प्रदूषणमुक्त भारत करण्यासाठी सायकल हा चांगला पर्याय असल्याचे ते सतत सांगत असतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावसार यांनी केले. सुर्यकांत मुथीयान यांनी आभार मानले. राजीव भावसार, प्रविण लडकत, शिरीष पांडव, तुषार शिंदे, मनिषा हिंगणे, बाबा काळे आदींसह पर्यावरण मित्रांनी संयोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button