breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

कोलकाताचा राजस्थानवर दणदणीत विजय; मुंबईची डोकेदुखी वाढली

IPL 2021 KKR vs RR – राजस्थानविरूद्धच्या सामन्यात कोलकाताने तब्बल ८६ धावांनी मोठा विजय मिळवून Top 4 मध्ये स्थान पटकावले. शिवम मावीचा बळींचा चौकार आणि त्याला लॉकी फर्ग्युसनकडून मिळालेली ३ बळींची साथ यांच्या जोरावर कोलकाताने राजस्थानला अवघ्या ८५ धावांमध्ये गुंडाळलं. या विजयासह कोलकाताने १४ सामन्यात १४ गुणांसह आणि तगड्या नेट रनरेटसह चौथं स्थान गाठलं. आता मुंबईला जर प्ले-ऑफ्सची फेरी गाठायची असेल, तर उद्याच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईला भल्या मोठ्या फरकाने सनरायजर्स हैदाराबादच्या संघाला पराभूत करावेच लागेल.

कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला राजस्थानचा धुव्वा

कोलकाताच्या संघाने २० षटकात १७१ धावा केल्या होत्या. शारजाच्या मैदानावरील ही यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान संघाची त्रेधातिरपीट उडाली. यशस्वी जैस्वाल (०), लियम लिव्हिंगस्टोन (६), संजू सॅमसन (१), अनुज रावत (०), शिवम दुबे (१८), ग्लेन फिलिप (८), ख्रिस मॉरिस (०) हे सारे खेळाडू स्वस्तात बाद झाले. राहुल तेवातियाने ४४ धावांची खेळी केली, पण त्याला कोणाचीही साथ मिळू शकली नाही. अखेर ८५ धावांवर राजस्थानचा संपूर्ण संघ तंबूत परतला.

राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

नाणेफेक गमावलेल्या कोलकाता संघाला आजच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक असताना सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. अय्यरने ३८ तर शुबमन गिलने ५६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर नितीश राणा (१२) आणि राहुल त्रिपाठी (२१) झटपट बाद झाले. अखेर दिनेश कार्तिक (नाबाद १३) आणि मॉर्गनने (नाबाद १४) संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button