TOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

कोल्हापूर उद्या होणार स्तब्ध : राजर्षि शाहू महाराज यांना मानवंदना !

कोल्हापूर |

६ मे १९२२ या दिवशी राजर्षि शाहू महाराजांचे निधन झाले त्या दिनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.आणि या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे.
येत्या ६ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता सारे कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध होणार आहे. ही स्तब्धता म्हणजे, राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार १०० सेकंद थांबून रस्त्यावर जिथे आहे तिथे दीड मिनिटे थांबून हे स्तब्धता रुपी वंदन प्रथमच साकारले जाणार आहे. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत.
या निमित्ताने शाहू महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय करून ठेवले आहे. त्याचे स्मरण केले जावे. त्यांच्या या कार्याची स्मृती प्रत्येकाच्या मनात रुजावी हा यामागचा उद्देश आहे.
१ मे पासून स्तब्धते बाबत दररोज एफएम, रेडिओ, सर्ववृत्तवाहिन्या, चॅनलवरून सतत प्रसिद्धी दिली जाणार आहे. ६ मे सकाळी १० वाजता १०० सेकंदासाठी स्तब्धता आपल्या शाहू राजासाठी असे वारंवार घोषित केले जाणार आहे. तसेच शहरात आपत्कालीन सूचना देण्यासाठी ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्पीकर वरून बिगुल वाजवून पूर्वसूचना दिली जाणार आहे. या शिवाय सर्व उद्योग व्यवस्थापनातील सायरन, रुग्णवाहिका वरील सायरन १० वाजता एका वेळी वाजविले जाणार आहेत. जेणेकरून आता आपण स्तब्धता पाळायची आहे याची जाणीव नागरिकांना करू दिली जाणार आहे. स्तब्धतेसाठी सर्व वाहतुकीची १०० सेकंदासाठी थांबावी यासाठी चौकाचौकात स्वयंसेवक उभे राहणार आहेत ते शिट्टी वाजवून स्तब्धता क्षणाची सर्व वाहनधारकांना जाणीव करून देणार आहेत.त्यामुळे सर्व वाहने आहे त्या जागी काही क्षण थांबणार आहेत. राजश्री शाहू महाराजांनी समाजकारण, कला, क्रीडा, शेती, उद्योग, व्यापार जल व्यवस्थापन या सर्व अंगाने सार्‍या देशाला अभिमान वाटेल असा कारभार केला आहे. किंबहुना कोल्हापूरसाठी त्यांनी अनेक योजना करून ठेवल्या आहेत. समाजकारणात तर शाहू महाराजांनी करून ठेवलेले कायदे आज ही मानवी हक्काचा पाया मानले जातात. त्यांचे निधन अवघ्या ४८ व्या वर्षी झाले २८ वर्षे त्यांनी राज्यकारभार केला आणि त्या कालावधीत पुढे पिढ्यानपिढ्या आदर्श घेता येईल असा राज्यकारभाराचा वास्तुपाठच घालून दिला. त्यामुळे त्यांच्या या कार्याला वंदन म्हणून शाहू स्मृती शताब्दी पर्व साजरे केले जात आहे आणि त्यातील स्तब्धता म्हणजे एक अनोखे वंदन असणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button