breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

KKR ला नमवून मुंबई इंडियन्स फायनलमध्ये

बेंगळुरू : कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मिचेल जॉन्सन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा सहा विकेटनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. आता २१ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसरी क्वॉलिफायर लढत झाली. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या दोन्ही साखळी लढतींत बाजी मारली होती. साहजिकच तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करून अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ उत्सुक होता. मुंबई इंडियन्सने ‘कोलकाता’चा डाव १०७ धावांतच गुंडाळला. प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सने १५व्या षटकातच चार विकेटच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘मुंबई’कडून कृणाल पंड्याने ३० चेंडूंत सात चौकारांसह नाबाद ४२ धावांची, तर कर्णधार रोहित शर्मान २४ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह २६ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय कर्ण शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी सार्थ ठरविला. दुसऱ्याच षटकात बुमराहने ख्रिस लिनला पोलार्डकरवी झेलबाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात कर्णने सुनील नारायणला, तर सहाव्या षटकात बुमराहने रॉबिन उथप्पाला बाद केले. त्यामुळे सहाव्या षटकातच कोलकाता नाइट रायडर्सची ३ बाद २५ अशी स्थिती झाली होती. सातवे षटक कोलकाता नाइट रायडर्सला ‘बॅकफुट’वर ढकलणारे ठरले. कर्णने या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर कर्णधार गौतम गंभीर आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना बाद केले. गौतमने १५ चेंडूंत दोन चौकारांसह १२ धावांची खेळी केली, तर कॉलिनला खातेही उघडता आले नाही. त्या वेळी कोलकाता नाइट रायडर्सची ५ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर इशांत जग्गी आणि सूर्यकुमार यादव यांनी ‘कोलकाता’ला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. पंधराव्या षटकात कर्णने जग्गीला जॉन्सनकरवी झेलबाद केले. जग्गीने ३१ चेंडूंत तीन चौकारांसह २८ धावांची खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने कोलकाता नाइट रायडर्सला शतकी टप्पा पार करून दिला.
संक्षिप्त धावफलक ः कोलकाता नाइट रायडर्स – १८.५ षटकांत सर्वबाद १०७ (सूर्यकुमार यादव ३१, इशांक जग्गी २८, गौतम गंभीर १२, सुनील नारायण १०, कर्ण शर्मा ४-०-१६-४; जसप्रीत बुमराह ३-१-७-३, मिचेल जॉन्सन ४-०-२८-२, लसिथ मलिंगा ३.५-०-२४-१) पराभूत वि. मुंबई इंडियन्स – १४.३षटकांत ४ बाद १०८ (कृणाल पंड्या नाबाद ४२, रोहित शर्मा २६, पार्थिव पटेल १४, कायरन पोलार्ड नाबाद ९, पियूष चावला २-३४).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button