breaking-newsताज्या घडामोडीपुणे

किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत वाढ, दिवाळी तुरुंगातच जाणार

पुणे – मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. शिवाजी नगर कोर्टाने आज त्याच्या कोठडीत वाढ केल्याने किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाने गोसावीची अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावीवर 5 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती अॅड. किरण गोसावी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button