राजे, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका! निलेश राणेंची जहरी टीका
मुंबई – मराठा आरक्षणप्रश्नी जनमनाचा कौल घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. त्यानंतर आता ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून मराठा समाजाचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडून समाजाला न्याय देण्याची मागणी करत आहेत. मात्र अशातच छत्रपती संभाजीराजे यांच्या या भूमिकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी जहरी टीका केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच संभाजीराजेंनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या या भेटीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. ‘संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल, तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’, असे म्हणत निलेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका केली आहे.
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही. https://t.co/BDcXXdl7QM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 27, 2021
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. आता यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.