खुशी मुल्ला हीची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड
पिंपरी- केंब्रिज क्रिकेट अकॅडमी ची खेळाडू व पिंपरी-चिंचवडची सुपुत्री खुशी मुल्ला हिची अंडर 19 महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे .या आनंदाप्रीत्यर्थ केंब्रिज स्कूल चे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, शाळेचे संचालक व केंब्रिज क्रिकेट ॲकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक श्री.राम रैना, सहाय्यक प्रशिक्षक आकाश भंडारी यांच्या हस्ते खुशी मूल्ला हिला बेस्ट प्लेयर टी शर्ट भेट* देण्यात आला. त्याचप्रमाणे प्रशिक्षण खर्चासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले.
प्रशिक्षक श्री.राम रैना यांच्या मार्गदर्शनात तयारी करणाऱ्या खुशी ची निवड संपूर्ण शहर व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे कौतुकोद्गार तिच्या पालकांनी व्यक्त केले.
“केंब्रिज क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करून भारतीय क्रिकेट संघासाठी नेतृत्व संपन्न खेळाडू निर्माण करण्याचे ध्येय घेऊन वाटचाल” करीत असल्याचे मत कॅम्ब्रिज स्कुल चे संचालक व मुख्य प्रशिक्षक श्री.राम रैना यांनी व्यक्त केले