breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !

  • राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले भूमिकेचे स्वागत
  • माजी खासदार आढळराव पाटील म्हणातात…माझी ग्वाही… पण !

पुणे । प्रतिनिधी

खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ उभारण्याबाबत पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांनी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे  आणि माजी खासदार शिवाजीराव  आढळराव पाटील यांना आवाहन करणारे पत्र लिहिले. त्याला आजी-माजी खासदारांनी सकारात्मक उत्त्र दिल्यामुळे लांडगे यांचे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’शिरुर लोकसभा मतदार संघाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने विमानतळाच्या मुद्यावर यशस्वी होताना दिसत आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्टयासह निवासी पट्यातील भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रस्तावित खेड विमानतळाबाबत आमदार महेश लांडगे आग्रही आहेत. याबाबत लांडगे यांनी आजी-माजी खासदार कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्याशी पत्रसंवाद करण्याचा प्रयत्न केला.

यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी खेडमध्ये विमानतळ व्हावे. यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. राजकीय जोडे बाजूला ठेवून शिरुर आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी काम करण्याच्या भूमिकेचे डॉ. कोल्हे यांनी स्वागत केले. तसेच, नाशिक फाटा ते मोशी पर्यंतच्या रस्त्याचे सहापदरीकरणात अडथळा ठरणाऱ्या भूसंपादनाचे काम मार्गी लावण्याबाबत आमदार लांडगे यांना आवाहनही केले.

दुसरीकडे, माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीरावा आढळराव पाटील यांनीही आमदार लांडगे यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, बहुप्रतिक्षीत आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात व्हावे यासाठी आपण माझ्याशी पत्रव्यवहार करून मांडलेल्या भूमिकेबद्दल आपले स्वागत करतो. खेड तालुक्यात विमानतळ व्हावे याकरिता मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून यासाठी लागणारे सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे. हे करत असताना खेडचे प्रस्तावित विमानतळ पुरंदरला का गेले? याबाबतची वस्तुस्थिती समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे, असेही आढळराव पाटील यांनी सूचवले आहे.

आमदार लांडगेंच्या सो बत कोल्हे अन्‌ पाठिशी आढळराव पाटील…

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही आमदार लांडगे यांनी खेडमध्ये विमानतळ होण्याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आढळराव पाटील यांनी खेड तालुक्यात विमानतळ होण्याबाबत आम्ही आमदार लांडगे यांच्या पाठिशी खंबीरपणे आहोत, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. तसेच, खेडमध्ये होणारे विमानतळ पुरंदर तालुक्यात का गेले? याचा अभ्यास करण्याबाबत संबंधित कागदपत्रे पाठवून सूचित केले आहे. दुसरीकडे, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनीही आमदार लांडगे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच, खेडमध्ये विमानतळ व्हावे.यासाठी सोबत पाठपुरावा करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे खेडमधील प्रस्तावित विमानतळाच्या मुद्यावर आमदार लांडगे यांच्या सोबत कोल्हे आणि पाठिशी आढळराव पाटील आहेत, अशी राजकीय स्थिती पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button