breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कॅटरिना कैफचा आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’चा मुहूर्त ठरला

  • कॅटरिनाचा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार

अभिनेत्री कॅटरिना कैफचा आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कॅटरिनाने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रदर्शनाची तारीख आणि चित्रिकरण सुरू केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित केला जाणार असल्याचे तिने म्हटले आहे.

कॅटरिनाने ‘मेरी ख्रिसमस’चे चित्रिकरण 22 डिसेंबरपासून सुरू केले आहे. चित्रपटात कॅटरिनासोबत दक्षिणेतील सुपरस्टार विजय सेतुपति देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया या थ्रिलर चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी यांच्याकडून होतेय.

मुंबईच्या स्टुडियोमध्ये चित्रपटाचे पहिले चित्रिकरण निश्चित करण्यात आले आहे. हा चित्रपट 90 मिनिटांचा राहणार असून याचे चित्रिकरण 30 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. मुंबई आणि पुण्यातही हे चित्रिकरण पार पडणार आहे. कॅटरिनाचे पुढील वर्षी ‘मेरी ख्रिसमस’सह ‘टायगर-3’, ‘फोन भूत’, ‘जी ले जरा’ आणि ‘ब्लडी डॅडी’ हे चित्रपट झळकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button